शब्दशाही शब्दशाही
नव्या युगाचे नवे शब्दकोडे
← परत मुख्य मेनू
"शब्दशाही" बद्दल

"शब्दशाही" हा नव्या युगाचा, नवीन स्वरूपातला शब्दकोड्यांचा खेळ आहे. आजच्या जमान्यात आपल्या लाडक्या मराठी भाषेचा वापर बराच कमी झालेला आहे. अशा वेळी रोजच्या रोज आपलं मराठी शब्दसामर्थ्य तपासून बघणारा, मेंदूला चालना देणारा आणि थोडक्यात मनोरंजन करणारा असा हा खेळ आहे. "शब्दशाही"चा तुम्ही आस्वाद घ्या, रोज खेळा आणि इतरांनाही खेळायला प्रेरित करा!

← परत मुख्य मेनू
खेळाचे नियम
अ. शब्दकोडी दोन प्रकारची असतील. तिकोडे (तीन शब्दांचे कोडे) आणि चौकोडे (चार शब्दांचे कोडे).
ब. रोज एक नवीन तिकोडे आणि एक नवीन चौकोडे दिले जाईल.
क. प्रत्येक कोड्यासोबत कोड्यातल्या शब्दांना आवश्यक मुळाक्षरे, स्वर आणि जोड दिले जातील. उदा. जर "स्वागत" हा एकच शब्द असेल तर:
मुळाक्षरेग   स   त   व
स्वरआ (काना)
जोड
ड. याचा अर्थ ग, स, त आणि व ही मुळाक्षरे, एक काना आणि एक जोड (स्व तयार करण्यासाठी) वापरून हा शब्द तयार होईल.
इ. प्रत्येक शब्दाला एक शब्दसंकेत दिलेला असेल. उदा:
शब्दसंकेतशब्द
छत्रीपाऊस
शेतकरीनांगर
डोंगरपर्वत
फ. दिलेले शब्दसंकेत, मुळाक्षरे, स्वर आणि जोड वापरून कोड्यातले शब्द ओळखायचे आहेत.
ग. कोडे कठीण वाटल्यास 'अक्षर मदत' घेऊ शकता. एका कोड्यात जास्तीत जास्त ३ अक्षरांसाठी मदत मिळेल.
← परत मुख्य मेनू
← परत